दुपारचे जेवण झाल्यानंतर सुस्ती येते आणि एखादी छानशी डुलकी काढावीशी वाटते. काही जण जेवणानंतर झाेपणे महत्त्वाचे समजतात.याला स्पॅनिश भाषेत ‘सिएस्टा’ म्हणतात. चला पाहू तर दुपारी जेवणानंतर झाेप का येते ते? निराेगी माणसाच्या शरीरात र्नताचे प्रमाण पाच ते सहा लिटर असते. र्नत आपल्या शरीरात इंधनाचे काम करते. शरीराचे काेणतेही काम करण्यासाठी मेंदूकडून आदेश दिले जातात. मेंदूला काम करण्यासाठी र्नतातून मिळणाऱ्या ऑ्निसजनची आवश्य्नता असते.जेवण केल्यानंतर पित्ताशयात चावलेले भाेजन पचवण्याचे काम सुरू हाेते.यामुळे र्नताचा ओघ पित्ताशयाकडे वाढू लागताे.मेंदू आणि शरीराच्या इतर भागात र्नताच्या कमतरतेमुळे आपल्याला सुस्ती येऊ लागते. त्यामुळे शरीरातील निरनिराळ्या भागांना पुरेसा ऑ्निसजन मिळत नाही व जांभया येऊ लागतात. यासाठी तज्ज्ञांनी जेवणानंतर 20 मिनिटे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.