चेन्नईतील ऑटाे ड्रायव्हर अण्णादुराई देतात मॅनेजमेंटवर लेक्चर

    12-Jul-2021
Total Views |

auto_1  H x W:
 
 
गेल्या 35 वर्षांपासून ऑटाे रिक्षा चालविणारे अण्णादुराई यांचे शिक्षण फ्नत 11 वी पर्यंतच झाले आहे. पण ते व्यवस्थापन, स्टार्टअप आणि इनाेव्हेशन या बाबतीत तज्ज्ञांनाही सल्ला देऊ शकतात, अशी त्यांची ‘माहिती क्षमता’ आहे.अण्णादुराई यांची ऑटाेरिक्षा एक प्रकारचे आयटी कार्यालयच आहे.अण्णादुराईच्या व्यवस्थापन काैशल्याने प्रभावित हाेऊन अनेक कार्पाेरेट कार्यालये त्यांना व्याख्यान (लेक्चर) देण्यासाठी आमंत्रित करतात. अण्णादुराई यांनी ‘हाॅटेलचा वेटर’ म्हणून नाेकरी सुरू केली.2010 मध्ये त्यांनी ऑटाे चालविण्यास सुरुवात केली. ते ऑटाेमध्ये एखाद मासिक किंवा दैनिक वर्तमानपत्र ठेवत.पण, सुरुवातीला घरातील लाेकांना हा वायफळ खर्च वाटत हाेता. पण अण्णादुराई ग्राहकांची सुविधा आणि मार्केटिंगची पद्धत मानतात. 2013 मध्ये अण्णादुराईंना एका स्थानिक कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांनी इतके जाेरदार व माहितीने परिपूर्ण व्याख्यान दिले की, राताेरात त्यांना प्रसिद्धी मिळाली.
 
आता ते त्यांच्या ऑटाे रिक्षामध्ये लॅपटाॅप, आयपॅड, गुगल हाेम, अ‍ॅल्नसा 11 इंचाचा स्मार्ट टीव्ही., स्वाईप मशीन, माेफत वायफाय, पिण्याचे पाणी आणि फ्रीजसुद्धा आहे. ते म्हणतात की ऑटाे चालकांची छबी बदलल्याशिवाय परिवर्तन हाेणार नाही, असा विचार करून त्यांनी ऑटाे चालकांशी चर्चा सुरू केली आहे.काेराेनापूर्वी अण्णादुराई दरमहा सरासरी एक ते दीड लाख रुपये कमावित असत. आता ते दिवसभरात 150 प्रवाशांची ने-आण करतात व ऑटाेच्या सुविधांसाठी दरमहा19,000 रुपये खर्च करतात. ‘वर्क फ्राॅम हाेम’चा त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.अण्णादुराई यांच्याकडून व्यवस्थापन आणि औद्याेगिक काैशल्य जाणून घेणाऱ्यांमध्ये आय आय टी आणि बिटस पिलानीचा समावेश आहे. अण्णादुराईंनी आतापर्यंत 350 बड्या कंपन्या आणि 205 काॅलेजमध्ये लेक्चर दिली आहेत. 7 वेळा ट्रेड टाॅकमध्ये सहभागी झाले हाेते.अण्णादुराई महिन्यातून एक दिवस कस्टमर रिलेशनशिप डेव्हलपमेंट स्पर्धा आयाेजित करतात. ते स्पर्धकांना 5 प्रश्न विचारतात व अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला 1000 रुपयाचे कूपन देतात. शिवाय त्यांच्या ऑटाेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक कूपन देतात.