बेट म्हणजे जमिनीचा असा भाग असताे ज्याच्या चारही बाजूला पाणी असते. समुद्र, सराेवर, नदीवर बेटे तयार झालेली दिसून येतात. भूकवचातील हालचालींमुळे काही भूभाग खचल्याने अगर समुद्रतळ वर उचलला गेल्याने, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने, ज्वालामुखी क्रियेमुळे किनाऱ्यानजीक गाळाच्या भरीने वा समुद्रात प्रवाळखडकांची निर्मिती हाेऊन ते जलपृष्ठावर उंचावले गेल्यामुळेही लहानमाेठ्या बेटांची निर्मिती हाेते.बेटं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे, तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबाेधले जाते.
इंग्रजीत माेठ्या बेटाला आयलंड, तर अगदी लहान बेटाला बहुधा आयल किंवा आयलेट असे संबाेधिले जाते. तथापि ब्रिटिश बेटांबाबतही अनेकदा आयल्स ही संज्ञा वापरली जाते.बेटाचा आकार लहानमाेठा असू शकताे. ऑस्ट्रेलिया हेही एक बेटच आहे. परंतु, भूगाेलज्ञ त्याचा समावेश खंडात करतात. जगात ग्रीनलंडसारखी माेठी, त्याचप्रमाणे अनेक लहानसहान बेटेही आहेत.
काही बेटांची उंची कमी असते, तर काही बेटे मात्र समुद्रपातळीवर इतक्या कमी उंचीची असतात की, लहानसहान लाटांमुळेही संपूर्ण बेट पाण्याखाली जाते. बेटांच्या समूहाला द्वीपसमूह म्हणतात.उदा., अंदमान व निकाेबार.