दशहरी जातीचे झाड 200 वर्षांचे आजही देते आंबे !

11 Jun 2021 14:53:27
 
 
 
 
mango_1  H x W:
आंबा फळाच्या शेकडाे जाती असून, प्रत्येक राज्याचा विशेष आंबा आहे. उत्तर प्रदेशची खासियत असलेल्या दशहरी किंवा दशेरी आंब्यांच्या एका झाडाला ‘मदर ऑफ मँगाे ट्री’ म्हटले जाते. हे झाड 200 वर्षे जुने असून, आजही आपल्या फळांनी ते आंबा रसिकांच्या जिव्हेची तृप्ती करते आहे.दशहरी जातीचा आंबा आता खूपच लाेकप्रिय ठरला असून, त्याची माेठी निर्यातसुद्धा हाेते. या जातीचे पहिले झाड लखनाैजवळ दशहरी गावात लावले गेले आणि त्यावरूनच या आंब्याला दशहरी नाव पडले.नबाब माेहम्मद अन्सार अली यांनी हे झाड 200 वर्षांपूर्वी लावले हाेते. आजही या झाडाची पहिली फळे त्यांच्या परिवाराला पाठविली जातात. या भागात दशहरीचे सर्वाधिक उत्पादन हाेते. अवध नगरीचा नबाब असफदुल्ला राज्यावर आला तेव्हा त्याने हे झाड कब्जात घेतले हाेते. या झाडाची फळे सर्वसामान्य लाेकांना मिळू नयेत, अशी त्याची इच्छा हाेती असे सांगतात. आता आंध्र प्रदेश येथेही या आंब्याची लागवड केली गेली आहे. दशहरी नेपाळ, मलेशिया, हाँगकाँग, फिलीपिन्स, सिंगापूर येथे निर्यात केला जाताे.
Powered By Sangraha 9.0