संपूर्ण जग काेराेना महामारीला आळा घालण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे त्रस्त आहे. परंतु आयर्लंडच्या डब्लिन येथील कार्ला फिजरगार्ड या 34 वर्षांच्या लठ्ठ महिलेसाठी लाॅकडाऊन वरदान ठरले आहे. कारण गेल्या 14 महिन्यांत कार्लाचे वजन 60 किलाे कमी झाले आहे. एक वर्षापूर्वी तिचे वजन तब्बल 146 किलाे हाेते. तिच्या या लठ्ठपणामुळे तिला राेजच अनेक समस्यांचा सामना करावा लागत हाेता. पण काेराेनामुळे लाॅकडाऊन लागू झाले व तिने कॅलाेरी नियंत्रित आहार घ्यायला सुरुवात केली. वर्कआऊट संतुलित केले. आता 60 किलाे वजन कमी झाल्यामुळे तिच्या बऱ्याच समस्या कमी झाल्यामुळे तिने खूपच आनंद व्य्नत केला आह