तीन काेटींपेक्षा जास्त मध्यमवर्गीय बनले गरीब

    04-May-2021
Total Views |
 
 
देशातील 2020 मधील लाॅकडाऊनचा इफे्नट
 
lockdown_1  H x
गेल्यावर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये देशात जगातील सर्वांत माेठे लाॅकडाऊन लागू झाले आणि एकाच झट्नयात देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी हाेऊन 3 काेटींपेक्षा जास्त मध्यमवर्गीय गरीब बनले. मुळातच गरीब असलेले व हातावर पाेट असलेल्या लाेकांची स्थिती तर खूपच वाईट आहे. त्यातच आता काेराेनाची दुसरी लाट आली. यामुळे तर स्थिती जास्तच खराब हाेण्याची भीती व्य्नत हाेत आहे.
सध्या काेराेनाची लाट जाेरात आहे. त्यामानाने ऑ्निसजन, लस आणि काेराेनाचा मुकाबला करणाऱ्या साधनांचा तुटवडा आहे. सरकार त्यावर मात करण्याचा कसाेशीने प्रयत्न करीत आहे; पण ज्या मंद गतीने लसीकरण आणि ऑ्निसजनचा पुरवठा हाेत आहे ते पाहता काेराेनामुळे मृत्युसंख्या, बेराेजगारी व आर्थिक अडचणी वाढण्याची श्नयता व्य्नत हाेत आहे. नाेएडाच्या आशिष आनंदचे उदाहरण घेऊया.
 
त्याचे फॅशन डिझायनर हाेण्याचे स्वप्न हाेते. ताे फ्लाईट अटेंडंट म्हणून नाेकरी करीत हाेता. थाेडीफार बचत करून मित्र व नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन र्नकम जमविली व दिल्लीत भाड्याने दुकान घेऊन कलोन्थ स्टाेअर्स फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू केले आणि देशात काेराेनाची साथ पसरली. देशात कडक लाॅकडाऊन लागू झाले. त्यानंतर आनंद दुकानाचे दाेन महिन्यांचे भाडे देऊ शकला नाही. त्यामुळे कापड दुकान बंद करावे लागले. अशीच लाखाे व्यावसायिकांची स्थिती झाली आहे. गेल्यावर्षी देशात काेराेनाची महामारी येण्यापूर्वी मध्यमवर्गियांची संख्या 9 काेटी 90 लाख हाेती, ती आता 6 काेटी 60 लाखांवर आली आहे. आता तर काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्थिती निर्माण केली आहे.
 
आज लाेक काेराेनाशिवाय काेणत्याही आजाराची चर्चा करीत नाहीत. सर्वत्र काेराेनाचीच भीती दिसते. अमेरिकेच्या मॅसेच्युएटस एमहर्स्ट विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राेफेसर जयंती घाेष म्हणतात की, काेराेनामुळे संपूर्ण देशाचीच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. गेल्या वर्षी काेराेना काळात लाॅकडाऊनमुळे 10 काेटींपेक्षा जास्त लाेक बेराेजगार झाले हाेते. सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमीचे अध्यक्ष महेश व्यास म्हणाले की, भारतात गरिबी, असमानता, राेजगारांची कमी आणि तुटपुंजे उत्पन्न याबाबतीत सध्या तरी काेणीही चर्चासुद्धा करीत नाहीत. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मध्यमवर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे महेश व्यास यांनी स्पष्ट केले.