इंग्लंडच्या टांकसाळीत एकेकाळी फ्नत चलनी नाणी तयार करीत असत. पण राजाच्या कारकिर्दीत साेने-चांदीची सुद्धा नाणी तयार हाेत असत. एका सुलतानाने कातड्याची नाणी चलनात आणली हाेती; परंतु आता इंग्लंडच्या शाही टांकसाळीत 20 सेें. मी. रुंद आणि 10 किलाे वजनाचे पाैंडाचे नाणे तयार करण्यात आले आहे. हे नाणे तयार करण्यासाठी तब्बल 400 तास लागले. या नाण्यावर 10 हजार पाैंड (अंदाजे 10 लाख 30 हजार रु.) लिहिले आहे. या नाण्याचे पाॅलिशिंग आणि लेसर फ्राॅस्टिंग करण्यासाठी 4 तास लागले. इंग्लंडच्या शाही राजवटीच्या 1100 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच इत्नया माेठ्या आकाराचे आणि वजनाचे नाणे तयार करण्यात आले आहे. क्वीन्स बिस्ट काॅमेमाेराेटिव्ह कले्नशन सिरीजचे हे शेवटचे नाणे आहे. 1953 मध्ये राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी वेस्ट मिनिस्टर अॅबेकडे जाणाऱ्या मार्गावर पाैराणिक प्रतीकात्मक पशू सिंह, घाेडा, बैल, ड्रॅगन, युनिकाॅर्न, फाल्कन पक्षी इ. 10 प्रतीकांच्या चित्रांचा या अवाढव्य नाण्यांवर डिझाइन स्वरूपात वापर करण्यात आला आहे.