शून्यापासून शिखरापर्यंत...

    03-May-2021
Total Views |
बिकानेरचं एक छाेटंसं दुकान हाेतं हल्दीराम
 
c_1  H x W: 0 x
 
1937 मध्ये बिकानेरच्या एका छाेट्या दुकानापासून सुरू झालेलं हल्दीराम... या दुकानात काही निवडक मिठाया आणि नमकीन ठेवत. आता याच दुकानात शंभराहून अधिक उत्पादनं आहेत. जी देश-विदेशांतही विकली जातात. पन्नासच्या दशकात दुकानातून दर आठवड्याला दाेन किलाे भुजिया विकली जात असे. दाेन पैसे प्रतिकिलाेपासून सुरू झालेला भाव पंचवीस पैसे प्रतिकिलाेपर्यंत पाेहचला.बिकानेरच्या भुजिया बाजारात ताे बारा वर्षांचा मुलगा खूप प्रसिद्ध हाेता. जाे भुजिया चांगल्या झाल्यात का, हे बघण्यासाठी उकळत्या तेलात हात घालत असे. वाढत्या लाेकप्रियतेमुळे हल्दीरामने भुजियाचं नाव बिकानेरचा राजा डंगुर यावरून ठेवले आणि डंगुर शेवही प्रसिद्ध झाली.बिझनेस वाढविण्यात खरं याेगदान दिलं ते तिसऱ्या पिढीनं. आपली उत्पादनं देशाच्या राजधानीपर्यंत पाेहचवली. चांदणी चाैकात एका छाेट्याशा स्टाॅलने सुरुवात झाली. 1984 मध्ये झालेल्या दंगलीत हे दुकान जळलं, पण दाेन्ही भावांनी हे पुन्हा सुरू केलं. अशाप्रकारे देशभरात दुकानं सुरू करण्याचा सिलसिला सुरू झाला. मग देशाच्या बाहेर किती प्रमाणात विक्री हाेऊ शकते, याची शक्यता पडताळण्यात आली. 1993 मध्ये पहिल्यांदा उत्पादनं अमेरिकेत गेली. आता पन्नासहून अधिक देशांमध्ये ही उत्पादनं विकली जात आहेत.सध्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नागपूर, नवी दिल्ली, काेलकता, बिकानेर येथे आहे.पहिली फॅक्टरी 1970 मध्ये नागपूरमध्ये सुरू झाली.2016 मध्ये या कंपनीचं साम्राज्य साधारण पाच हजार कराेड रुपये हाेतं.