ठाणे महापालिकेचा 3 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण

    03-May-2021
Total Views |
 
महापाैर, आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडले लसीकरण
 


vaccination_1   
ठाणे शहरात सुरू असलेल्या लसीकरण माेहिमेत ठाणे महापालिकेने महापाैर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 लाख काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी तयार करण्यात आलेल्या काेविशिल्ड व काेव्हॅक्सिन लसीचा डाेस टप्प्याटप्प्याने देण्याचे काम पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध हाेणाऱ्या लससाठ्यानुसार महापालिका, तसेच खासगी हाॅस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डाेस देण्यात येत आहे. यात आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयाेगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डाेस देण्यात येत आहे.
 
महापाैर व आयुक्तांनी महापालिकेच्या आनंदनगर येथील आपला दवाखाना येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण माेहिमेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपायुक्त संदीप माळवी, अशाेक बुरपल्ले, आराेग्य अधिकारी डाॅ. चारुदत्त शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डाॅ. खुशबू टावरी आदी उपस्थित हाेते. पालिकेच्या 44 आराेग्य केंद्रांत आणि खासगी 14 हाॅस्पिटलमध्ये व्यापक प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण माेहिमेला नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, महापाैर व आयुक्तांनी ठाणेकरांचे आभार मानले आहेत.