महामेट्राेची माहिती : मुठा नदीच्या 80 मीटर रुंद पात्राखाली बाेगदा; मेट्राेच्या कामांना मिळणार वेग
पुणे शहरातील भूमिगत मेट्राे मार्गिकेसाठी नदीपात्राखालून बाेगदा निर्मितीचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाला. नदीच्या 80 मीटर रुंद पात्राखाली बाेगदा करण्यात आला आहे. भुयारी मार्गिकेचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाल्यामुळे मेट्राेच्या कामांनाही वेग मिळणार आहे.मेट्राे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्राे मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गिकेपैकी शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असून, त्यासाठी बाेगदा निर्मितीची प्रक्रिया महामेट्राेने सुरू केली आहे. टनेल बाेअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) हे काम करण्यात येत आहे. यात शिवाजीनगर ते धान्य गाेदामादरम्यानच्या 1600 मीटरच्या दाेन बाेगद्यांचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले. संपूर्ण मुठा पात्र 150 मीटर रुंद असून, नदीतील पाण्याचे पात्र 80 मीटर रुंद आहे. सध्या मुठा तळापासून 13 मीटर खाेलीवर टीबीएमद्वारे बाेगदा निर्मिती करण्यात आल्याची माहिती महामेट्राेकडून देण्यात आली.
मेट्राे प्रकल्पात शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दाेन मार्गिकांची कामे सुरू आहेत. सध्या दाेन्ही मार्गिकांची मिळून 40 ट्न्नयांपेक्षा जास्त कामे झाली आहेत. त्यामुळे हे दाेन्ही मार्ग काही टप्प्यांत सुरू करण्याचे नियाेजन महामेट्राेने केले आहे. दाेन मार्गिकांपैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मार्गिका पुण्यातील शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत स्वरूपाची असून, शेतकी महाविद्यालयापासून स्वारगेटपर्यंतचा मार्ग भूमिगत आहे. भूमिगत मेट्राे मार्गिकेची लांबी 4.74 कि.मी. असून, यात 2.37 कि.मी.चे दाेन बाेगदे आहेत. फडके हाैद, मंडई, स्वारगेट येथे भूमिगत मेट्राे स्थानके आहेत. सध्या कृषी महाविद्यालयापासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयापर्यंतच्या दाेन्ही बाजूंच्या बाेगदा निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे, तर स्वारगेटच्या बाजूने भूमिगत मेट्राे मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे.