आध्यात्मिक विचारांची मुले नास्तिक मुलांच्या तुलनेत अभ्यासात हुशार असतात. असा निष्कर्ष लँकेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी 8000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अध्ययन केल्यानंतर काढला आहे. याचे कारण धार्मिक आस्था आहे. अशा मुलांना आध्यात्मिक विचारांच्या शाळेत जाण्याचीही गरज नसते. अध्ययनासाठी 14 वर्षांच्या मुलांची निवड करण्यात आली हाेती. या मुलांचे म्हणणे असे की, त्यांना विश्वास महत्त्वाचा आहे. आध्यात्मिक विचार असलेले विद्यार्थी अभ्यासात हुशार व अव्वल असतात. त्यामुळे त्यांना नावाजलेल्या महाविद्यालयात सहज प्रवेश मिळताे. या संदर्भात आणखी सविस्तर संशाेधन हाेण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांनी प्रतिपादन केले आहे.