हार्लेची पॅन अमेरिका 1250 अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात

03 May 2021 18:21:31

bike_1  H x W:
 
अमेरिकन ऑटाे कंपनी हार्ले डेव्हिडसनने नुकतीच त्यांची बहुप्रतीक्षित लाेकप्रिय पॅन अमेरिका 1250 अ‍ॅडव्हेंचर माेटरसायकल भारतीय बाजारात आणली आहे. दमदार इंजिन आणि मस्त लुक असलेली ही बाईक नवीन अवतारात भारतीय बाजारात आली आहे. या बाईकच्या निमित्ताने कंपनीने भारतात त्यांच्या दुसऱ्या खेळीची सुरुवात केल्याचे मानले जात आहे. ही बाईक दाेन व्हेरियंटमध्ये असली तरी दाेन्हीचे इंजिन सारख्याच क्षमतेचे आहे. दाेन्हीत फरक करण्यासाठी काही वेगळी फिचर्स दिली गेली आहेत. यात फुल एलईडी लाईट, ब्ल्यू टूथ इनेबल्ड 6.8 इंची कलर टीएफटी टच स्क्रीन डिस्प्ले, यूएसबी सी टाईप आउटलेट ही फिचर्स दाेन्हीमध्ये आहेत.
 
प्रीमियम इलेक्ट्राॅनिक्स ऑपरेटेड सेमी अ‍ॅक्टिव्ह सस्पेन्शन, सेंटर स्टँड, हिटेड ग्रिप्स, टायर प्रेशर माॅनिटर सिस्टीम अशी कार्समध्ये असणारी फिचर आहेत. ऑटाे बाईकला अ‍ॅडाॅप्टिव्ह राईट लाईट सिस्टीम हे फिचर प्रथम याच बाईकला दिले गेले असून, टायर प्रेशर माॅनिटर हे प्रीमियम कार्समध्ये दिले जाणारे फिचर या बाईकला दिले गेले आहे. यात पाच रायडिंग माेड आहेत. दाेन्ही बाईकसाठी 1252 सीसी रिव्हाेल्युबल मॅक्स इंजिन सहा स्पीड गिअरबाॅक्ससह आहे. या बाईकची एक्स शाेरूम किंमत 16.90 लाख रुपये असून, टाॅप माॅडेलची किंमत 19 लाख 99 हजार आहे.
Powered By Sangraha 9.0