लाॅकडाऊनमुळे 44% विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम

    03-May-2021
Total Views |
 

childrens_1  H  
 
सध्या काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्वरूप धारण केले आहे व पुन्हा-पुन्हा लाॅकडाऊन लागू हाेत असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत हाेत आहे. पण विद्यार्थ्यांच्या मेंदूवरही विपरीत प्रभाव पडत आहे. असा दावा उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मनाेविकार विभागाच्या तज्ज्ञांनी केला आहे. या विभागाने मार्च-2020 नंतर देशाच्या निरनिराळ्या राज्यात पालक आणि विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेतले व लाॅकडाऊनचा त्यांच्यावर काेणता परिणाम हाेत आहे, याचे अध्ययन केले. हे अध्ययन संवेदनात्मक, काैटुंबिक वातावरण, सामाजिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र अशा 4 मुद्यांवर करण्यात आले.
 
त्यात लाॅकडाऊनचा मुलांच्या मनावर खाेलवर परिणाम हाेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी 4 वेळा लाॅकडाऊन लागू करण्यात आले. त्यात ऑनलाइन शिक्षण आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातच बसून राहावे लागत असल्यामुळे 44% विद्यार्थ्यांच्या मेंदूवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले. हे ऑनलाइन अध्ययन उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, मध्यप्रदेश, केरळ, बिहार आणि कर्नाटकमध्ये करण्यात आल्याचे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मेडिकल काॅलेजच्या प्राेेसर डाॅ. देवश्री अखाेरी यांनी सांगितले.