काेराेना काळात शरीराबराेबर जपा मनाचे आराेग्यसुद्धा

    03-May-2021
Total Views |
 
 
  • भीतीच्या सावटाखाली असताना राेगप्रतिकारश्नती दुर्बल हाेते
  • तणाव निर्माण करणारे संप्रेरक जास्त निर्माण हाेणे आराेग्यासाठी अयाेग्य 
  • मुलांकडे जास्त लक्ष देऊन त्यांच्याबराेबर खेळा, व्यायामाची सवय लावा

corona_1  H x W 

शारीरिक आराेग्याचा संबंध मनाबराेबरसुद्धा असताे. मन दुर्बल हाेण्याचा परिणाम शरीरावर हाेताे. भीतीमुळे मन कमजाेर हाेऊ लागते आणि आराेग्याला त्याचा फटका बसताे. सध्या सुरू असलेल्या महामारीच्या काळात आपण सगळे यातून जात आहाेत. वाढत्या संसर्गामुळे मनातील भीती तीव्र हाेते आहे. पण आता गरज आहे सावध राहण्याची. सध्या आपण सगळे भीतीच्या सावटाखाली जगताे आहाेत. काेराेनाचा संसर्ग काेणाला हाेईल याची कसलीही खात्री नसणे हे त्यामागचे मुख्य कारण असून, गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या महामारीमुळे सगळा जीवनक्रम विस्कळीत झाला आहे. संसर्गापासून शरीराचे रक्षण करायचे उपाय आपल्याला माहिती आहेत. वारंवार हात धुणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे सवयीचे झाले आहे. पण मानसिक आराेग्याकडे किती जणांचे लक्ष आहे हे विचारले तर फार काेणाचे नाही असे म्हणावे लागेल. भीतीच्या सावटाखाली असताना आपली राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.
 
 नेहमीच्या स्थितीत आपल्या शरीरातील संरक्षक पेशी राेगजंतूंना प्रतिकार करत असतात. पण वातावरण भीतिदायक असेल तर आपल्या शरीरातील ‘काेर्टिसाॅल’ नावाचे तणाव निर्माण करणारे संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवायला लागते. काही प्रमाणात ते याेग्य असले तरी त्याचे प्रमाण वाढल्यावर मात्र आपली राेगप्रतिकारशक्ती दुबळी हाेऊ लागते. शरीरातील ‘काेर्टिसाॅल’चे प्रमाण वाढण्यास काही प्रमाणात आपणही कारणीभूत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशाेधनातून सिद्ध झाले आहे. कधी साेशल मीडियातील माहिती, कधी बातम्या ऐकण्यापाहण्यातून तर कधी आपल्याच नकारात्मक विचारसरणीमुळे आपल्या शरीरात थाेड्या थाेड्या प्रमाणात हे संप्रेरक तयार हाेते. ही प्रवृत्ती वाढत गेली तर आराेग्य बिघडते. आपल्या मनात दिवसभरात असे साठ हजारांपेक्षा जास्त भीतिदायक विचार येत असतील तर स्थिती चिंताजनक असते आणि त्यामुळे राेगप्रतिकारशक्ती कमी हाेऊन ती व्यक्ती संसर्गाला बळी पडण्याची श्नयता जास्त असल्याचे या संशाेधनात दिसून आले.
 
लहान मुलांवर परिणाम - प्राैढ व्यक्ती तणावाखाली असताना लहान मुलेही त्याच्या विळख्यात येऊ लागली आहेत. गेल्या वर्षीपासून शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे मुलांचा अभ्यास ऑनलाइन सुरू आहे. पण केवळ अभ्यास हेच मुलांचे जीवन नसते. त्यांना मित्रांबराेबर खेळावयाचे असते आणि गप्पा मारायच्या असतात. पण महामारीमुळे मुले घरात अडकली आहेत. प्रत्यक्ष वर्गात बसून शिकण्याची मजा ऑनलाइन क्लास नसते. त्यामुळे मुले तणावाखाली येतात आणि त्यामुळे पालकही. लहानपणी सहन कराव्या लागलेल्या तणावाचा परिणाम प्राैढपणातील आयुष्यावर हाेऊ शकताे. त्याला ‘अर्ली लाइफ स्ट्रेस’ म्हणतात. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आराेग्यावर हाेताे. यावर उपाय म्हणजे मुलांबराेबर खेळा, त्यांना गाेष्टी सांगा, त्यांना अभ्यासात मदत करा. मुलांची तब्येत चांगली राहण्यासाठी त्यांना व्यायामाची गाेडी लावा. त्यासाठी काही दिवस तुम्हीसुद्धा मुलांबराेबर व्यायाम करा. व्यायामामुळे राेगप्रतिकारशक्ती वाढते तसेच तणावाचा निचरा हाेत असल्याने ही आराेग्यदायी सवय त्यांना लवकर लावणे फायद्याचे ठरेल. त्यातून मुलांमधील सकारात्मक वृत्ती वाढून ती समाधानी राहतील.