पारसपेक्षाही मूल्यवान गाेष्ट काेणती?

    03-May-2021
Total Views |

bg_1  H x W: 0  
 
जुन्या काळापासून अशा एका दगडाविषयी बाेललं जातं. ज्याच्या स्पर्शाने लाेखंडाची वस्तू साेन्याची बनते. या चमत्कारी दगडाला पारस दगडाच्या नावाने ओळखलं जातं.याच्याविषयी काही किस्से, कथा प्रसिद्ध आहेत.पारस दगडाविषयी अनेकांनी ऐकले असेल; परंतु हा दिसताे कसा? त्याचे स्वरूप काय आहे? हा कुठे आहे? हे अजूनही काेडंच आहे.पारस दगडाविषयी एक कथा अशी आहे.
गरिबीला कंटाळून एका ब्राह्मणाने शिवजीला प्रसन्न करण्यासाठी कठाेर तप केलं. शंकराने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, वृंदावनात सनातन गाेस्वामींजवळ जाऊन त्यांच्याकडे पारस दगड माग, त्यामुळे तुझी गरिबी दूर हाेईल.जेव्हा ताे गरीब ब्राह्मण तिथे गेला, तेव्हा त्याला वाटलं, या सनातन गाेस्वामीजवळ पारस दगड राहूच शकत नाही. कारण अंगावर एक जीर्ण धाेतर आणि दुपट्टा हाेता.तरीपण त्याने गाेस्वामींना आपल्या गरिबीबद्दल सांगत पारस दगड मागितला.गाेस्वामी गरीब ब्राह्मणाला म्हणाले, ‘‘एक दिवस जेव्हा मी गंगेतून स्नान करून परत येत हाेताे.तेव्हा एका दगडाला माझा पाय लागला. त्याची आभा पाहून मला ताे अद्भुत वाटला. त्यावर पाय पडू नये या विचाराने मी त्याला तिथेच मातीखाली दाबलं आणि पुन्हा आंघाेळ करून परत आलाे.तू तिथे जाऊन ताे दगड काढ. ताेच पारस दगड आहे.’’ असं म्हणून स्वामीजींनी ते स्थान सांगितलं.ब्राह्मण तिथे गेला. ताे पारस दगड काढला व साेबत आणलेल्या लाेखंडाच्या तुकड्याला दगडाने स्पर्श केला, लाेखंडाच्या तुकड्याचं साेन्यात रूपांतर झालं.ब्राह्मणाच्या मनात आलं.या पारस दगडावर अधिकार तर गाेस्वामीजींचा आहे; परंतु ते तर यापासून दूर राहू इच्छितात. म्हणूनच तर त्यांनी पारसच्या स्पर्शानंतर परत आंघाेळ केली. न्नकीच त्यांच्याजवळ यापेक्षा मूल्यवान वस्तू आहे, जी देवाच्या भ्नतीने मिळते.