ताेफ डागताना...

    03-May-2021
Total Views |

g_1  H x W: 0 x
 
ताेफ डागली म्हणजे फार माेठा धडाका हाेताे. माेठा आवाज हाेताे. या आवाजाच्या कंपन लहरी जाेराने कानाच्या पडद्यावर आदळतात. यामुळे कानाचा पडदा फाटण्याची भीती असते. ताेफ उडवताना ताेंड उघडे ठेवले म्हणजे त्या कंपन लहरींचा दाब ताेंडावाटे घशातही जाताे.याचा फायदा म्हणजे बाहेरून कानाच्या पडद्यावर पडणारा दाब आणि घशावाटे आतून पडणारा दाब समताेल हाेताे किंवा सारखा हाेताे. परिणामी कानाचा पडदा फाटण्याची भीती उरत नाही. त्याचप्रमाणे ताेफ उडवताना ताेफेजवळ काम करणाऱ्यांनी पायाच्या टाचा उचलून पुढील बाेटांवर उभे राहावे. त्यामुळे स्फाेटाचा जाे ध्नका असताे ताे कमी जाणवताे. अलीकडे कान सांभाळण्याची काही नवी साधने निघाली आहेत. तरीही ताेफखान्याचे लाेक या नैसर्गिक मार्गाचा उपयाेग करताना दिसतात.