गणपत नावाचा एक गरीब ब्राह्मण हाेता. त्याच्या जवळपास राहणारा अब्दुल्ला नावाचा एक मुस्लिम मनुष्य हाेता. दाेघांची चांगली ओळखदेख हाेती. एके दिवशी गणपतने भेट झाली तेव्हा सहज म्हणून सांगितले की, त्याला स्वप्नात दिसले की, अब्दुल्लाने त्याला शंभर रुपए उसने दिले आहेत.खरे तर दाेघात तसा काहीएक व्यवहार नव्हता. पण याचा गैरफायदा घेऊन अब्दुल्ला त्याला अधूनमधून ते शंभर रुपये मागत असे. पहिल्यांदा गणपतने त्याकडे लक्ष दिले नाही. पण नंतर अब्दुल्ला त्याला ते दिले नाहीत तर मारहाण करण्याची धमकीही देऊ लागला.शेवटी गणपतने बिरबलाची भेट घेऊन हा प्रकार सांगितला.मग बिरबलाने त्याला एक यु्नती सांगितली. गणपतला त्याने मग दुसऱ्या दिवशी न्यायालयात बाेलावले व अब्दुल्लालाही. शिपाई पाठवून हजर राहण्यास सांगितले. ताे हजर झाल्यावर गणपतला त्याची सर्वांसमक्ष तक्रार सांगण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणपतने स्वप्नाची गाेष्ट सांगितली आणि अब्दुल्ला ते स्वप्नातले शंभर रुपये प्रत्यक्षात मागत आहे, असे सांगितले. अब्दुल्लाला त्याचे म्हणणे सांगायला सांगितले, त्यावर ताे म्हणाला, ‘राजा हरिश्चंद्राने स्वप्नात राज्याचे दान केलेले प्रत्यक्षात राज्याचा त्याग करून दिले, त्यावरून मी गणपतला पैसे द्यावेत असे म्हटले आणि त्यानेच ते स्वप्न मला सांगितले हाेते.’ गणपतराव यावर म्हणाला, ‘हुजूर मला स्वप्नाप्रमाणे प्रत्यक्षात वागायला आवडेल व त्याची माझी तयारी आहे पण कालच मला स्वप्न पडले की, अब्दुल्लाने माझ्याकडून त्याच्या बायकाेला देणगी देण्यास एक हजार रुपये घेतल्याचे व मीही त्याला दिले आहेत. ताेही व्यवहार अब्दुल्लाने पूर्ण करावा.’ यावर बिरबल म्हणाला, ‘अब्दुल्लाला जर शंभर रुपये हवे असतील तर दुसऱ्या स्वप्नाप्रमाणे एक हजार रुपयांचा व्यवहार केला पाहिजे. ते माझ्यासमाेर आताच द्यावेत म्हणजे माझे न्यायदानाचे काम लगेच पूर्ण हाेईल.’ अब्दुल्ला आता अस्वस्थ हाेऊन म्हणाला, ‘अहाे स्वप्नात घेतलेले पैसे मिळाले नाहीत तर परत कसे करणार?’ ‘ते काही नाही. हरिश्चंद्राप्रमाणे स्वप्नातला व्यवहार करावा असे तूच तर सांगितलेस ना? तेही सर्वांसमाेर तेव्हा बऱ्या बाेलाने गणपतला हजार अधिक शंभर रुपये, परत कर नाहीतर एक वर्षभर मी तुला तुरुंगात डांबून टाकीन.’ बिरबल म्हणाला.
शेवटी हा व्यवहार अंगाशी येत आहे हे पाहून अब्दुल्लाने एक हजार शंभर रुपये गणपतला दिले आणि पाेबारा केला.बिरबलाच्या चातुर्याने गणपतला पैसे तर मिळाले आणि इतरांनाही जरब वाटली.