तणाव डाेकेदुखीला कारणीभूत

    03-May-2021
Total Views |

f_1  H x W: 0 x 
 
डाेकं अनेक कारणांनी दुखू शकते.आपली जीवनशैलीही डाेकेदुखीला कारणीभूत आहे. खाण्याच्या अनियमित वेळा जशा डाेकेदुखीला आमंत्रण देतात, तसंच तणावही डाेकेदुखीसाठी जबाबदार ठरताे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला तणावाचा सामना करावा लागताे.वेळ पाळण्याचं टेन्शन, कामाचं प्रेशर, काैटुंबिक समस्या यांसारखी अनेक कारणांमुळे ताण निर्माण हाेतं. त्याचा आपल्या शरीर-मनावर परिणाम हाेताे.काहींच्या बाबतीत हे प्रमाण भयंकरही असू शकते, उच्च रक्तदाब, हार्ट अ‍ॅटॅक यांसारख्या समस्यांसाठीही तणाव सहाय्यक ठरताे.सतत सतावणाऱ्या डाेकेदुखीसाठीही तणाव हे एक महत्त्वाचे कारण ठरते.तणावामुळे डाेकं जेव्हा दुखतं जेव्हा डाेक्याच्या चारही बाजूंना वेदना हाेतात तसंच डाेकं ओढल्यासारखे वाटते. ही लक्षणं तणाव, चिंता, अधिक भावूक हाेणे किंवा झाेपण्याच्या मुद्रेत परिवर्तन हाेणे यामुळेही दिसतात.