ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचे याेग्य नियाेजन : डाॅ. राजेंद्र शिंगणे

03 May 2021 19:58:30
 

Remdisivir_1  H 
 
 
राज्यातील सर्व जिल्ह्यांत ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात हाेण्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून याेग्य नियाेजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत आहे. त्याप्रमाणे वितरण हाेण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वताेपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक छाेटे उत्पादक आहेत. त्यांचेही उत्पादन वाढले आहे. या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे 1270 टन इतके ऑक्सिजन उत्पादन राेज हाेत असल्याचे डाॅ. शिंगणे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0