जीवन सुलभ बनविणारे ऑनलाइन शाॅपिंग

    03-May-2021
Total Views |
बदलत्या टे्ननाॅलाॅजीने आज जीवन अतिशय साेपे झाले आहे. विविध इले्नट्राॅनिक गॅजेट्समधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दैनंदिन जीवन सरळ आणि साेपे झाले आहे. आणि ते स्वस्त असल्याने खिशावर भार पडत नाही. क्षणाेक्षणी नवीन तंत्रज्ञान पुढे येत असल्याने त्याविषयीची माहिती ठेवणे आवश्यक आहे...
 
g_1  H x W: 0 x
 
आधुनिक युगाच्या नवीन टे्ननाॅलाॅजीच्या मदतीने दरराेजच्या कामांमध्ये सुलभता आली आहे. आणि त्याचे सर्वांत चांगले उदाहरण आहे, ऑनलाइन शाॅपिंग. ज्यामध्ये ग्राहकाला काेणतीही गाेष्ट घेण्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागत नाही, तर सामान ग्राहकाच्या घरी पाेहाेचवले जाते.अशा वेळी ऑनलाइन शाॅपिंगने आपली एक वेगळी ओळख बनविली आहे. पूर्वी जेथे लाेक ऑनलाइन सामान खरेदी करण्यात संकाेच करीत असत, आणि आपल्या बँकेशी निगडित माहिती देण्यास भीत हाेते. तेथेच आज लाेक बेधडकपणे निश्चिंत हाेऊन काेट्यवधींचे सामान ऑनलाइन खरेदी करत आहेत. भारतात असे अनेक प्रदेश आहेत, जेथील लाेकांपयंत ऑनलाइन शाॅपिंगची सुविधा उपलब्ध नाहीये. अशा वेळी हा असा एक प्लॅटफाॅर्म समाेर आला आहे, जाे आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या घरगुती आणि आवश्यक वस्तूंवर सर्वांत चांगली डील देताे. ताे आता अनेक लहानात लहान शहरांमध्ये पसरला आहे. या प्लॅटफाॅर्मच्या विस्तारामागे मुख्य कारण, येथे उपलब्ध हाेत असलेली चांगली डील्स असणे हे आहे. हेच कारण आहे की, आता आपल्या छाेट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही ऑनलाइन किराणाच्या वेबसाइट पाेहाेचल्या आहेत.