कांद्याचा जन्म पाच हजार वर्षांपूर्वीचा

03 May 2021 13:58:42
 
b_1  H x W: 0 x
 
श्रीमंतांपासून गाेरगरिबांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा कांदा हा पृथ्वीवर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे काही वनस्पती व कृषिशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.फ्रान्समधील वैद्यक विश्वातील बुजूर्ग म्हणून समजल्या जाणाऱ्या हिफ्राेके्रटस्ने सुमारे चाेवीसशे वर्षांपूर्वी कांद्याचे गुणगान केलेली वर्णने आढळतात. कांदा खाल्ल्याने नजर सुधारते, असे ताे म्हणायचा. त्याचे हे मत लाेक डाेळे मिटून स्वीकारत व भरपूर कांदा खात असत.इ.स. 1596 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ग्रेट हर्बल’ या पुस्तकातही कांद्याच्या औषधी गुणधर्माबद्दल सांगितले आहे. त्यात असेही लिहिले आहे की कांद्यात शरीराची श्नती वाढवण्याचा अद्भुत गुणधर्म आहे.इजिप्तमधील पिरॅमिड बांधण्यासाठी नेमलेल्या गुलामांना जेवणात भरपूर कांदा खायला घालत असत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक सामर्थ्यात वाढ व्हावी असा हेतू त्यामागे असायचा. हे खरेही असेल, कारण त्यामुळेच पिरॅमिडच्या रूपाने एवढ्या अद्भुत व मजबूत शिल्पांची उभारणी हाेऊ शकली.
Powered By Sangraha 9.0