मंदिर बंद असल्याने ऑनलाइन दर्शनाचे ट्रस्टचे आवाहन शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेल्या दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलाेभनीय रूप...चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि माेगऱ्याच्या सुवासिक फुलांनी गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व माेगरा महाेत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाइन दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, माेगरा महाेत्सव आयाेजिण्यात आला हाेता. सरपाले फ्लाॅवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही पुष्परचना केली.
यंदाच्या पुष्पसजावटीत 200 किलाे माेगरा, 1100 चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, तगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडाे फुले वापरण्यात आली, तसेच श्रींच्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरीच्या उटीचे लेपन करण्यात आले हाेते. ट्रस्टचे अध्यक्ष अशाेक गाेडसे म्हणाले, की मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरू आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाइट, अॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे
http://bit.ly/Dagdusheth_iphone_A pp A ndroid: http://bit.ly/ Dagdusheth_Android_A ppया लिंकवर 24 तास दर्शनाची साेय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा.