चेटकिणीमुळे गाव हाेतेय उजाड

    03-May-2021
Total Views |
 
 
Chetkin_1  H x
 
यूएईमधील एक गाव अल मदाम हे आता साहसी पर्यटनाची आवड असल्याचे आकर्षण बनले आहे. मात्र यूएई सरकार हे गाव पर्यटन नकाशावर आणण्यासाठी फारसे उत्सुक नाही असे दिसून येत आहे. दुबईपासून केवळ 1 तासाच्या आणि शारजापासून जवळ असलेल्या या गावाचे गूढ उलगडलेले नाही आणि त्यामुळे त्याचे आकर्षण वाढत चालले आहे. गावात अगदी अगाेदर आराखडा काढून बांधावी तशी घरे आहेत. एक मशीद आहे. 1970 पर्यंत या गावात वस्ती हाेती, पण नंतर एका रात्रीत हे गाव साेडून गावकरी निघून गेले असे सांगतात. त्यांनी इतक्या घाईत गाव साेडले, की घराचे दरवाजे सताड उघडे आहेत आणि घरातील फर्निचर वाळूत दाबले गेले आहे.
 
घरे आजही चांगल्या स्थितीत आहेत. एकाएकी गाव उजाड झाल्याने अनेक कथांना जन्म मिळाला आहे. आसपासचे गावकरी सांगतात, या गावात एक जिन आल्याने गावकरी त्याच्या भीतीने गाव साेडून पळाले. कुणी सांगतात, येथे मांजरासारखे डाेळे असणाऱ्या एका चेटकिणीने गावाचा ताबा घेतला आणि त्यामुळे तिला घाबरून गावकरी निघून गेले. पण खरी हकीकत सांगणारा अजून तरी कुणी सापडलेला नाही. कुणी सांगतात वाळूचे अतिभयानक वादळ झाल्याने लाेकांनी सामान न घेताच संरक्षणासाठी दुसरीकडे धाव घेतली आणि त्यामुळे घरात, दारात, गावात सर्वत्र वाळूचे ढीग लागले आहेत.