कर्जराेख्यांतून चार हजार काेटींचा निधी

    03-May-2021
Total Views |
 
महसुली काेंडी फाेडण्यासाठी राज्य सरकारने याेजला उपाय
 
 
bonds_1  H x W:
 
 
 
नवीन आर्थिक वर्ष सुरू हाेताच काेराेना नियंत्रणासाठी लावलेले निर्बंध, तसेच लसीकरणासाठी साडेसहा हजार काेटींची तरतूद केल्याने महसूल काेंडी झालेल्या राज्य सरकारने तातडीचा उपाय म्हणून कर्जराेख्यांच्या विक्रीतून चार हजार काेटींचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काेराेनामुळे आर्थिक नियाेजन काेलमडलेले असताना 10226 काेटी तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये विधानसभेत सादर केला हाेता. 2021- 22 च्या अर्थसंकल्पात महसुली जमा 3 लाख 68 हजार 987 काेटी रुपये राहील आणि खर्च 3 लाख 79 हजार 213 काेटी रुपये राहून 10226 काेटींची महसुली तूट राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला हाेता. मात्र, लसीकरणावरील तरतूद, वाढलेली रुग्णसंख्या आणि निर्बंधांमुळे राज्याची महसूल काेंडी झाली. त्यामुळे चार हजार काेटींच्या कर्जराेख्यांची विक्री करण्यात येणार आहे.
 
लसीकरणासाठी साडेसहा हजार काेटींची तरतूद राज्य सरकारने केल्याने राज्याचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. मार्चमध्ये राज्यातील अर्थचक्र सुरू हाेते, पण एप्रिलमध्ये देशभरात व राज्यात माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण वाढल्याने आधी निर्बंध व नंतर टाळेबंदीसदृश कठाेर निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे आता राज्याची महसूल काेंडी झाली असून, त्यावर तातडीचा उपाय म्हणून ही 4 हजार काेटींची कर्जराेखे विक्री करण्यात येणार आहे. या कर्जराेख्यांपैकी दाेन हजार काेटींचे कर्जराेखे 11 वर्षांचे, तर उर्वरित दाेन हजार काेटींचे कर्जराेखे 12 वर्षांचे असतील. 4 मे राेजी या कर्जराेख्यांची लिलावाद्वारे विक्री हाेईल. राज्यातील विविध विकास कामांसाठी हा निधी वापरला जाईल.