आता लसीकरण करण्यासाठी अँब्युलन्स तुमच्या घरी येईल

    03-May-2021
Total Views |
 

ambulance_1  H  
 
18 ते 45 वयाेगटातील यंगस्टर्सचे काेराेना लसीकरण सुरू हाेईल. त्यावेळी लस घेणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असेल, त्यामुळै ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील खासगी हाॅस्पिटल्स घरपाेच अ‍ॅम्ब्युलन्स लसीकरण सर्व्हिस सुरू करण्याची तयारी करीत आहेत. सध्या काेविड लसीकरण केंद्रांसमाेर लस घेण्यासाठी ज्येष्ठ व इतर नागरिकांच्या रांगा पाहून अशी अ‍ॅंब्यूलन्स लसीकरण सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी हाेऊ शकते. असे हिंदुजा हाॅस्पिटलचे सीईओ जाॅय चक्रवर्ती यांनी प्रतिपादन केले आहे. यामुळे साेशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन हाेईल व काेराेना पसरण्याचा धाेका कमी हाेईल.
 
काेराेना लसीकरण करणाऱ्या खासगी हाॅस्पिटल्सचे मुख्य समन्वयक डाॅ. गाैतम भानुशाली म्हणाले की, बहुतेक खासगी हाॅस्पिटलकडे अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. त्यामुळे जवळच्या हाऊसिंग साेसायटी, काॅर्पाेरेट ऑफिस आणि इतर कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एक डाॅ्नटर, दाेन नर्स आणि लसीकरण सामग्री असेल लस घेतल्यावर काही त्रास झाला तर त्या व्य्नतीला लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करता येणार आहे. सध्या मुंबई शहरातील 76 हाॅस्पिटल्सला काेविड लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरू हाेण्यापूर्वी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.