- जगातील 17 माेठ्या बाजारपेठांच्या सर्वेक्षणानंतर काढलेला निष्कष
- नियाेजन करून किराणा मालाच्या खरेदीला सर्वत्र ग्राहकांचे प्राधान्य
- ताजी फळे, भाज्यांची खरेदी वाढली अन् जंक फूडचा खपही आहे कायम
काेराेना आणि त्यामुळे आलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम आपल्या जीवनावर झाला आहे. आपल्या बदलत असलेल्या अनेक सवयींमध्ये खरेदी हा घटकही आला आहे. काय, किती आणि कशासाठी, हे मुद्दे त्यात महत्त्वाचे ठरले आहेत. केवळ भारत नव्हे, तर जगभरातील देशांमध्ये ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलल्याचे ‘युगाेव्ह’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे. 17 माेठ्या बाजारपेठांत 18 हजार ग्राहकांची पाहणी करून बदललेल्या सवयींचा आढावा घेण्यात आला. भारतीयांच्या खरेदीच्या सवयींमध्ये सर्वाधिक बदल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेचा दणका आपण अनुभवताे आहाेत. संसर्ग राेखण्यासाठी देशभरातील बहुतेक राज्यांनी निर्बंध लागू केल्यामुळे लाेकांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत. बहुतेक बाजारपेठाही बंद आहेत. त्यामुळे किती नुकसान हाेईल याचा अंदाज एवढ्यात येणे श्नय नसले, तरी ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये माेठे बदल झाल्याचे ‘युगाेव्ह’च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. जगातील माेठ्या 17 बाजारपेठांतील 18 हजार ग्राहकांची पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींत खूप बदल झाल्याचे हे सर्वेक्षण सांगते. काेराेनाच्या काळात ग्राहकांच्या बदललेल्या सवयींत प्रामुख्याने किराणा मालाची खरेदी आहे. त्यात 83 टक्के ग्राहकांसह मे्निसकाे अव्वल असून, भारतात हे प्रमाण 81 टक्के आहे. हे सर्वेक्षण प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांमध्ये झाले.
भारत आणि मे्निसकाे या नव्या बाजारपेठा असून, सर्वेक्षणात प्रामुख्याने शहरी ग्राहकांच्या बदलत्या सवयींचे प्रतिबिंब उमटले आहे. काेराेनाची साथ 2020मध्ये चीनमधून सुरू झाली असली तरी त्या देशाच्या बाजारपेठेवर फारसा परिणाम झालेला नाही.
प्रथम त्या देशाला संसर्गाचा फटक बसला असला तरी आता अन्य देशांच्या तुलनेत चीनची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करते आहे. संसर्ग राेखण्यात आलेल्या यशामुळे जर्मनीची अर्थव्यवस्थाही चीनच्या वेगाने वाटचाल करत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. महामारीच्या काळापासून ग्राहकांच्या सवयींत मुख्य बदल झाला ताे किराणा मालाच्या खरेदीबाबत. यादी करून अथवा नियाेजन करून अशा वस्तू आता खरेदी केल्या जातात. यात आशिया-प्रशांत विभागातील ग्राहक जास्त आहेत. त्यात 92 ट्न्नयांसह इंडाेनेशिया अव्वल आणि 90 ट्न्नयांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नियाेजन न करता किराणा मालाची घाईने खरेदी करू किंवा गरज भासेल तेव्हा खरेदी करू असे म्हणणारे ग्राहक फार थाेडे आहेत. उत्तर अमेरिकेतील ग्राहकांनी नियाेजनपूर्वक खरेदी केली असली, तरी त्यांचे प्रमाण आशियायी बाजारपेठांपेक्षा कमी आहे. तेथे नियाेजनपूर्वक खरेदी करणारे ग्राहक 74 टक्के आहेत. खरेदीच्या सवयीत जास्त बदल युराेपमध्ये झाल्याचे सर्वेक्षणात दिसले. काय आणि कधी खरेदी करावे याचा निर्णय इटलीतील 95 टक्के ग्राहकांनी केला असून, डेन्मार्कमध्ये हे प्रमाण 69 ट्न्नयांपेक्षा कमी आहे, तर जर्मनीत असे 77 टक्के ग्राहक आहेत. भारतात काेराेनाची दुसरी लाट येण्यापूर्वी ‘फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स’बाबत (एफएमसीजी) डिसेंबर 2020मध्ये ‘युगाेव्ह’ने सर्वेक्षण केले हाेते. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश ‘एफएमसीजी’मध्ये हाेताे. दुसऱ्या लाटेचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाल्याचे सर्वेक्षणात दिसले.
महामारीच्या काळात लाेकांना आराेग्याची जाणीव झाल्याचे दिसते.
आपण ताजी फळे आणि भाज्या खरेदी करण्यावर भर दिल्याचे 38 टक्के ग्राहकांनी सांगितले, तर अशी खरेदी न करणाऱ्यांचे प्रमाण केवळ सहा टक्के हाेते. जंक फूडची मागणी कायम असल्याचे दिसते. आधीच तयार केलेले पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. या काळात मद्याचे सेवन वाढल्याचे दिसते. त्याचे प्रमाण एक चतुर्थांश आहे. दुग्धजन्य उत्पादनांचा खप 24 ट्न्नयांनी वाढल्याचे आढळले. सध्या बाहेर जाण्यावर निर्बंध असल्यामुळे साैंदर्य प्रसाधनांचा खपही कमी झाला आहे. सध्या आम्ही अशा वस्तू खरेदी करत नसल्याचे उत्तर एक तृतीयांश ग्राहकांनी दिले.