रेमडेसिवीर उत्पादन कंपन्यांना डाॅ. राजेंद्र शिंगणे यांची भेट

    01-May-2021
Total Views |
 
उत्पादन वाढवण्याचे आवाहन : सर्वताेपरी साह्याचे दिले आश्वासन
 

Remdisivir_1  H 
काेराेना उपचारांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही डाॅ. शिंगणे यांनी या कंपन्यांना केले. राज्यात काेराेनाचे संकट वाढते आहे, त्यावर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल, या अनुषंगाने डाॅ. शिंगणे, यांनी तारापूर एमआयडीसीतील कमला लाईफ सायन्सेस कंपनीस भेट देऊन कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष हाेत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला.
 
 
कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसिवीर व्हाॅयलची निर्मिती करत असून, कंपनीने आतापर्यंत 6 लाख व्हाॅयल्सची निर्मिती केली आहे. त्यातील 4 लाख व्हाॅयल सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख व्हाॅयल्स पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे अध्यक्ष डाॅ. झंवर यांनी सांगितले. तारापूर एमआयडीसीतील नेप्रड प्रा.लि. या कंपनीलाही त्यांनी भेट दिली. ही कंपनी डाॅ. रेड्डीज लॅबाेरेटरीज या कंपनीसाठी रेमडेसिवीर निर्माण करते. त्यांची पहिली बॅच 12 मे राेजी बाजारात येईल. या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन डाॅ. शिंगणे यांनी दिले आह