तापत्या उन्हातही मनाला प्रसन्न करणारा गुलमाेहर

    01-May-2021
Total Views |

Gulmohar_1  H x
भारताबराेबरच बांगलादेश, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत ही झाडे पाहायला मिळतात. प्रत्येक देशात फुलण्याचा कालावधी वेगवेगळा असताे. ही झाडे घनदाट सावलीसाठी लावली जातात. तापत्या उन्हात मनाला प्रसन्न करणारा गुलमाेहर जगात देखण्या वृक्षांमध्ये गणला जाताे. उन्हाच्या झळांना न जुमानता माेठ्या दिमाखात उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे हसतमुखाने स्वागत करणारा, आपल्या साैंदर्याने मनाला भुरळ घालणारा गुलमाेहर आपल्या लाल-केशरी फुलांच्या पायघड्या सर्वांसाठी घालत असताे. एप्रिल-मेमध्ये हा अंगाेपांगी बहरलेला असताे. आयुष्यातल्या संकटांना न घाबरता नेहमी हसत राहा, असंच सांगत असताे जणू. वाऱ्याच्या झुळकेने त्याची फुलं जमिनीवर पडतात आणि त्याच्या पाकळ्यांचा गालिचा पसरताे. रणरणत्या उन्हात गुलमाेहराच्या खाली प्रसन्न वाटतं. ग्रीष्माचा दाह शांत हाेताे. वसंत ऋतूत गुलमाेहर फुलू लागताे, ते पाऊस पडेपर्यंत ताे आपल्याला साथ देत असताे.
  
साताऱ्यात 1 मे हा ‘गुलमाेहर डे’ म्हणून साजरा केला जाताे. हा दिवस साजरा करणारे सातारा हे जगातील पहिलेच शहर असावे. 1999 सालापासून हा दिवस साजरा करण्यात येताे. मे महिन्यात गुलमाेहर चांगला बहरलेला असताे. त्यानिमित्ताने लाेक एकत्र येतात, चित्रांचे प्रदर्शन, काव्यसंध्या अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाताे. गुलमाेहर हा भारतीय वृक्ष नाही. जगभर ताे वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाताे. त्याची पाने, फुले, फळांचा आयुर्वेदात फारसा उपयाेग नाही. या झाडाखाली कुठल्या देवाचा वास नसताे, की कशाची भीती नसते, पण मनाला प्रुल्लित करणे, आनंद देणे हे माेठं काम गुलमाेहर करताे. वसंतात फुलणारा गुलमाेहर ‘ऑरनमंटर ट्री’ म्हणून ओळखला जाताे. त्याला पिकाॅक ट्री, फ्लेम ऑफ फाॅरेस्ट या नावानेही ओळखले जाते. भारताबराेबरच बांगलादेश, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत ही झाडे पाहायला मिळतात. प्रत्येक देशात फुलण्याचा कालावधी वेगवेगळा असताे. ही झाडे घनदाट सावलीसाठी लावली जातात. झाडांचा घेर माेठा असल्याने त्याच्या सावलीत इतर झाडे वाढण्याची श्नयता कमी असते.