आजकाल घरात कानात इयरफाेन घालून चालणारे, काम करणारे लाेक सर्वत्र दिसतात. इयरफाेन माेठ्या प्रमाणावर वापरले जातात. इयरफाेन सतत वापरले असता श्रवणशक्ती कमकुवत हाेऊ शकते. म्हणून इयरफाेन वापरा पण जरा जपूनच
- तुम्हाला संगीताची जास्त आवड असेल तर इयरफाेनच्या ऐवजी हेडफाेन वापरा. इयरफाेन हे कानाच्या आत घालावे लागतात. आपण जिथे इयरफाेन घालताे तिथे नाजूक काेशिका असतात ज्या ध्वनी मेंदूपर्यंत पाेहाेचवण्याचे काम करत असतात. जर सतत त्या काेशिकांच्या जवळ किंवा त्यांच्यावर इयरफाेन लावला तर आपली ऐकण्याची क्षमता कमी हाेऊ शकते.
- काही लाेकांचा असा गैरसमज असताे की जाेपर्यंत आपण माेठ्या आवाजात संगीत ऐकत नाही ताेपर्यंत आपल्याला जाेश येणारच नाही म्हणून ते कानात इयरफाेन घालून माेठा आवाज करून व्यायाम करत असतात किंवा ट्रेकिंग करतात. पण एक लक्षात ठेवा असे काहीही नसते. माेठ्याने संगीत ऐकल्याने थाेड्या वेळ जाेश येत असला तरी उलट त्यामुळे थकवा लवकर येताे आणि कानांचे नुकसान हाेते ते वेगळेच.
- इयरफाेनवर गाणे ऐकण्याची खूप जास्त आवड असली तरी दिवसभर कानात इयरफाेन घालून बसू नका. फारतर दिवसभरात एक ते दाेन तासच इयरफाेनने संगीत ऐका नंतर स्पीकरवर गाणी हळू आवाजात लावा म्हणजे इतरांना त्रास हाेणार नाही.
- खूप लाेक गाडी चालवताना फाेनवर बाेलण्यासाठी इयरफाेनचा वापर करतात असे कृपया करू नका. यामुळे अपघात हाेऊ शकताे. काहीही झाले आणि कितीही घाई असली तर गाडी थांबवूनच फाेन घ्या, फाेन हातात घ्या, इयरफाेन वापरू नका. आणि फाेन घेणे जास्त आवश्यक वाटत नसेल तर घेऊ नका. पाेहाेचल्यावर त्या व्यक्तीला फाेन करा.इयरफाेन वापरून झाला
- की आपण ताे कुठेही ठेवून देताे आणि नंतर वापरायच्या वेळेस ताे तसाच उचलताे. या मधल्या काळात इयरफाेनवर वातावरणातले जीवजंतू बसतात, ते आपल्या कानात जाऊ शकतात म्हणून दरराेज जर तुम्ही इयरफाेन वापरत असाल तर हँड सॅनिटायझरने ताे स्वच्छ करत चला.