बुरशीच्या वापराने मिळेल रासायनिक खतापासून शेतीला मुक्ती

    06-Apr-2021
Total Views |
 
f_1  H x W: 0 x
 
नवी दिल्ली, 5 एप्रिल (वि.प्र.) : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील संशाेधकांनी बुरशीपासून (कवक) राेपांना पाेषक घटक देण्याची पद्धत शाेधली आहे. पेरणीआधी आणि नंतर बुरशीचा वापर करता येईल. शेतकऱ्यांची शेती आता रसायनमु्नत हाेऊ शकेल.शेतीमध्ये उत्पन्न वाढण्यासाठी आतापर्यंत वापरात असणाऱ्या रासायनिक खताचा पर्याय बुरशी (कवक) हाेऊ शकते. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयूच्या) वैज्ञानिक टीमने केलेल्या संशाेधनातून हे परिणाम समाेर आले आहेत. जेएनयूचे स्कूल ऑफ लाइफ सायन्सचे प्राेफेसर अतुल कुमार जाेहरी यांच्या नेतृत्वाखाली हे संशाेधन झाले आहे. संशाेधक टीममध्ये ओमप्रकाश नारायण, निधी वर्मा, अभिमन्यू, जाेगवत, मीनाक्षी दुआ सामील आहेत. हे संशाेधन काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठित संशाेधन जर्नल द प्लांट सेलमध्ये प्रकाशित झाले.जेएनयूच्या प्राे. अतुल कुमार जाेहरी यांच्या म्हणण्यानुसार, मातीमध्ये नैसर्गिकरित्या पाेषक घटक असतात, पण पाेषक घटकांच्या संमिश्र रूपांमुळे राेपे त्यांना मातीतून ग्रहण करू शकत नाहीत. अशा वेळी राेपांच्या मदतीसाठी आता रासायानिक खतांचा वापर केला जाताे. त्यामुळे राेपांना पाेषक घटक पाेहाेचविण्यासाठी आता आपण रासायनिक खताचा (अमाेनियम सल्फेट) चा वापर करताे. जे मातीत मिसळून राेपाला सल्फेटपासून फाॅस्फेटसारखे पाेषक तत्त्व देताे. रासायनिक खते मातीला दूषित करतातच, त्याबराेबरच जास्त पाऊस झाल्यास रासायनिक खते वाहून जातात. त्यामुळे पाणीही दूषित हाेते. रासायनिक खतांच्या जागेवर जर आपण बुरशीचा वापर केला तर ती मातीत मिसळून राेपांना मातीतून सुलभतेने सल्फेट, फाॅस्फेट आणि मॅग्नेशियमसारखे पाेषक घटक सुलभतेने देईल. बुरशीला (कवक) पेरणीच्याआधी आणि नंतर मातीत टाकले जाऊ शकते. दीडपट वाढेल उत्पादन, राेगमु्नत हाेईल शेती प्राे. अतुल कुमार जाैहरी यांच्यानुसार रासायनिक खतांच्या तुलनेत बुरशी पिकांना पाेषण देण्यासाठी जास्त फायदेशीर आहे.