संध्यानंद.काॅम झाडाच्या खाेडामध्ये असलेल्या वलयांवरून हवामानाची माहिती मिळू शकते.झाडाच्या खाेडातील वलये (वर्तुळाकार) हवामानाची माहिती देऊ शकतात.ऐकण्यास हे थाेडे विचित्र वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड मधील संशाेधकांनी एका संशाेधनानंतर ही माहिती दिली. संशाेधनानुसार झाडाच्या खाेडामधील असलेल्या वलयांवरून मागील 400 वर्षांमध्ये आलेले पूर, दुष्काळाची स्थिती यांची माहिती मिळू शकेल. त्याचबराेबर भविष्यात हाेणाऱ्या पर्यावरणातील घटनांविषयी माहिती मिळू शकेल.