विरार-सुरत रेल्वे मार्गावरील मेमू सेवा 7 एप्रिलपासून सुरू हाेणार

    06-Apr-2021
Total Views |

vgf_1  H x W: 0 
 
पालघर, 5 एप्रिल (आ.प्र.) : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात गेल्या वर्षी 22 मार्चपासून बंद करण्यात आलेल्या काही मेमू गाड्यांच्या फेऱ्या 7 व 8 एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे अनारक्षित गाड्यांतून प्रवाशांना गुजरातमध्ये प्रवास करणे शक्य हाेणार आहे. पूर्वी सुरू असलेल्या शटलचे रूपांतर मेमूत करण्यात आले हाेते. मात्र, टाळेबंदीच्या काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय गाड्या व नंतर आरक्षित लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्यानंतरही आंतरराज्य प्रवास करणाऱ्या गाड्यांवर बंदी हाेती. विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणारी मेमू सेवा 7 व 8 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासाच्या उपयाेगी असणारी डहाणू ते बाेरिवली फेरी, तसेच बाेरिवली ते वलसाड फेरी सुरू झाल्यावर औद्याेगिक कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरणार आहे.