विठुरायाच्या दर्शनापूर्वी काेराेना चाचणी सक्तीची

    06-Apr-2021
Total Views |

x_1  H x W: 0 x 
 
साेलापूर, 5 एप्रिल (आ.प्र.) : संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यायचे असल्यास आता भाविकांना काेराेना चाचणी करावी लागणार आहे. तसा निर्णय विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयातून घेण्यात आला.सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातावर सॅनिटायझर फवारणी करणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे.राज्यात सध्या काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत आहे. राज्यातल्या काेराेना सुपरस्प्रेडर टाॅप टेन हाॅटस्पाॅट शहरांत साेलापूर जिल्ह्याचे नाव आले आहे.सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 5985 आणि शहरात 16391 इतके बाधित असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे काेराेनाच्या या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, नगरपालिका आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे.मंदिराच्या समाेरच संत ज्ञानेश्वर सभामंडपात भाविकांच्या अँटिजेन चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.