जहाजे का बुडतात, हे जाणून घेणे रंजक

    06-Apr-2021
Total Views |

५४_1  H x W: 0
 
आकाराने महाकाय असलेली ही जहाजे समुद्राच्या एका लाटेच्या फटक्याने उलटतात तेव्हा मात्र स्वतःच्या वजनाने समुद्राच्या तळाशी जाऊन विसावतात. या महाकाय जहाजांवर विविध प्रकारचा माल चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे नेण्यात येताे ,त्यामध्ये पाेलाद, अल्युमिनियम सारखे धातू आणि खनिज असलेली माती, कच्चे तेल, सिमेंट अशा अनेक वस्तू जहाजावर चढवून त्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा या जहाजावर लादण्यात आलेल्या मालामुळेच जहाजे बुडतात.आजपर्यंत पृथ्वीच्या पाठीवर लाखाे जहाजे समुद्रात बुडालेली आहेत. एका अंदाजानुसार दरवर्षी साधारणपणे दहा माेठी मालवाहू जहाजे समुद्रात बुडतात. त्यावरील कर्मचारी मरण पावतात. मालवाहतकू जहाजांमध्ये धातू, धातूमश्रित माती भरली जाते त्याचा आणि समुद्रावरील हवामानाच जहाजासाठी वापरलेल्या मटेरियलशी रासायनिक प्रक्रिया हाेत राहते. या रासायनिक प्रक्रियेला लिक्विफॅक्शन असे म्हटले जाते. त्यामुळे जहाजे कमकुवत हाेत जातात.2015 मध्ये 65 हजार टन वजनाचे ज्युपिटर नावाचे जहाज व्हिएनतामच्या जवळ समुद्रात बुडाले. त्यावरील 19 कर्मचाऱ्यांपैकी एकजण वाचला. या अपघातानंतर इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) जहाजावंर लादल्या जाणाऱ्या अल्युमिनियमच्या खनिजांबाबत इशारावजा सूचना जारी केली हाेती. मालवाहूतक जहाजांवर माल चढवताना खास खबरदारी घेण्याची गरज असते. विशिष्ट पद्धतीने काळजी घेऊन माल चढवावा लागताे.अनेकदा यासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. या दुर्लक्षामुळे जहाजाच्याखाली पाणी जाेराने उसळ्या घेते. त्यामुळे खनिज पाेलाद इकडेतिकडे हलूलागते. त्याचा परिणाम जहाजाच्या संतुलनावर हाेताे. पाण्याचा दाब वाढला तर अनेकदा जहाजावरील सगळा माल एका बाजूला घसरताे. ते पुन्हा जागेवर आणणे शक्य नसते.जहाज एका बाजूला कललेल्या स्थितीत प्रवास करत राहते. काहीवेळा तर जहाज इतके कलते की त्यात पाणी येऊ लागते आणि शेवटी जहाज बुडते. जहाजामध्ये माल चढवण्याच्या पद्धतीत थाेडा बदल केला तर असे अपघात राेखले जाऊ शकतात. त्याचबराेबर जहाजात काेणती खनिजे चढवली जावीत आणि काेणती जाऊ नयेत, त्याचे प्रमाण किती असावे, काेणत्या खनिजांमुळे रासायनिक प्रक्रिया वेगाने हाेते, विविध समुद्रात पाण्याचा दबाव कसा असताे, या गाेष्टींची काळजी घेतली तर समुद्रातील अपघातांचा धाेका कमी हाेऊ शकताे.