मुंबई, 5 एप्रिल (आ.प्र.) : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) मार्चमध्ये देशात विक्रमी वसुली झाली असताना महाराष्ट्रात गत महिन्याच्या तुलनेत जवळपास हजार काेटींनी अधिक वसुली झाली. मार्चमध्ये राज्यातून जीएसटीची 17038 काेटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी (2020) मार्चमध्ये झालेल्या वसुलीच्या तुलनेत यंदाची वसुली 14 टक्क्यांनी अधिक आहे.फेब्रुवारीत राज्यात 16103 काेटींची वसुली झाली हाेती. गेल्या महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हजार काेटींनी वसुली वाढली आहे.राज्यात डिसेंबरमध्ये 17699 काेटींची वसुली झाली हाेती. काेराेनाच्या निर्बंधांनंतर सर्वाधिक वसुली डिसेंबरमध्ये झाली हाेती. नाेव्हेंबरमध्ये 15 हजार काेटी, तर ऑक्टाेबरमध्ये 15799 हजार काेटींची वसुली झाली हाेती.मार्चमध्ये देशातून 1 लाख 23 हजार काेटींची जीएसटी वसुली झाली.यापैकी सर्वाधिक 17038 हजार काेटींची वसुली महाराष्ट्रातून झाली आहे.त्यापाठाेपाठ गुजरात 8197 काेटी, कर्नाटक 7914 काेटी व तमिळनाडू 7,579 काेटींची वसुली झाली.