यूट्यूब काढून टाकणार यूझर्ससाठीचे डिसलाइक फीचर

    06-Apr-2021
Total Views |
 
bg_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 5 एप्रिल (वि.प्र.) : सर्वांत माेठा व्हिडिओ प्लॅटफाॅर्म असणाऱ्या यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या खूप माेठी आहे. आता याच यूट्यूबने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक फीचर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना माेठा फायदा हाेईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. यासंदर्भात ‘द वर्ज’ माध्यमाने दिलेल्या एका वृत्तानुसार, यूट्यूबवरून डिसलाइकचे बटण काढले जाऊ शकते. यासाठी कंपनीने तयारीदेखील केली आहे.कंपनीचे म्हणणे आहे की, हे बटण हटविल्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ पाेस्ट करणाऱ्यांना थेट फायदा हाेईल. या संदर्भात यूट्यूबनेही ट्विट केले आहे. ङळज्ञश, ऊळीश्रळज्ञश, डहरीश आणि ऊेुपश्रेरव असे पर्याय यूट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली हाेते.आपला व्हिडिओ किती जणांना आवडला, नाही आवडला हे क्रिएटर्सला या टूल्समुळे कळते.डिसलाइकचे बटण हे थेट फीडबॅक देते. केवळ फीडबॅकसाठी लाइक आणि नापसंत यासारखी बटणं यूट्यूबने तयार केली हाेती, पण डिसलाइक बटणाचा गैरवापर हाेताना दिसत असल्यामुळे यूजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी हे बटण वापरू लागले आहेत.डिसलाइकचे बटण हे विराेध दर्शवण्याचे साधन म्हणून वापरले जाऊ लागले आहे.