मुठा नदीखाली बाेगदा निर्मितीचे काम सुरू

    06-Apr-2021
Total Views |
येत्या दहा दिवसांत पहिला बाेगदा पूर्ण हाेणे अपेक्षित; एप्रिलअखेर पूर्ण करणार दाेन बाेगद्यांचे काम
 
xs_1  H x W: 0
 
पुणे, 5 एप्रिल (आ.प्र.) : पुणे शहरातील मुठा नदीखाली भुयारी मेट्राेसाठीच्या बाेगदा निर्मितीचे काम सुरू झाले आहे. नदीच्या 80 मीटर रुंद पात्राखाली संपूर्ण बाेगदा तयार हाेण्यासाठी आणखी आठ ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या नदीच्याच नावाच्या मुठा या टनेल बाेअरिंग मशीनद्वारे (टीबीएम) पहिला बाेगदा पूर्ण झाल्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुळा या टीबीएमच्या माध्यमातून दुसऱ्या बाेगद्याच्या कामाला सुरुवात हाेईल. एप्रिलअखेर दाेन्ही बाेगद्यांची निर्मिती पूर्ण हाेईल, असा विश्वास महाराष्ट्र मेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनने (महामेट्राे) व्यक्त केला आहे.महामेट्राेतर्फे शिवाजीनगर ते धान्य गाेदाम (सिव्हिल काेर्ट) दरम्यानच्या 1600 मीटरच्या दाेन बाेगद्यांचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सिव्हिल काेर्ट येथून बुधवार पेठ (कसबा पेठ) स्थानकाच्या दिशेने मुठा टीबीएमने बाेगद्यासाठी खाेदकाम सुरू केले. गेल्या आठवड्यात या मशीनने नदीपात्रात प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष नदीखाली बाेगदा तयार करण्यास सुरुवात झाली. संपूर्ण मुठा नदीपात्र 150 मीटर रुंद असून, पाण्याचे पात्र 80 मीटर रुंद आहे.येत्या आठ ते 10 दिवसांत नदीखाली पहिल्या बाेगद्याचे काम पूर्ण हाेणार असून, त्यानंतर दुसऱ्या बाेगद्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महामेट्राेकडून देण्यात आली.देशात अनेक शहरांत मेट्राेची कामे केली जात असली, तरी नदीखाली बाेगदा निर्मितीचा हा दुर्मीळ प्रयाेग देशात तिसऱ्यांदा हाेत आहे. यापूर्वी मुंबई मेट्राे रेल्वे काॅर्पाे रेशनने मिठी नदीखाली मेट्राे-3 साठी बाेगद्याची निर्मिती केली आहे; तसेच काेलकता मेट्राेसाठी हुगळी नदीखाली बाेगदा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुठा नदीखाली बाेगदा निर्मितीचे काम सुरू झाले आहे.