अमेरिकन महिलेने शंभर दिवस घातला एकच ड्रेस

    06-Apr-2021
Total Views |

r_1  H x W: 0 x 
 
न्यूयाॅर्क, 5 एप्रिल (वि.प्र.) : अनेक व्य्नती विविध गाेष्टी करून प्रसिद्धीच्या झाेतात येत असतात.एका अमेरिकन महिलेने अनाेखा मार्ग अवलंबिला.अमेरिकेतील एक महिला सध्या चर्चेत आहे. चर्चेचे कारण आहे तिचा ड्रेस.खरेतर राॅबिन्स काेले यांनी सतत शंभर दिवस एकच ड्रेस घालून ठेवला. त्यांनी सहली आणि कार्यक्रमांना जातानाही हाच ड्रेस कायम ठेवला. तथापि, काेले यांनी ड्रेसला नेहमी वेगळ्या पद्धतीने परिधान केले. त्यांनी विनाफॅशन राहण्यासाठी आणि घराला वाचविण्यासाठी सप्टेंबर 2020 ला सुरू केलेल्या 100 डे ड्रेस चॅलेंजसाठी हे केले.