13 वर्षांच्या मुलीचे रूपांतर पुतळ्यात हाेत आहे...

06 Apr 2021 12:24:04
 
f_1  H x W: 0 x
 
संध्यानंद.काॅम जगातील अतिशय दुर्मीळ आजाराने त्रस्त असलेल्या लंडनमधील मुलीवर इलाज केले जाऊ शकत नाहीत. कारण या आजारावर इलाजच नाहीत. लंडनमधील एक मुलगी हळूहळू पुतळ्यात रूपांतरीत हाेत आहे. त्या मुलीला फायब्रायडिस्लेप्सिया ऑटीफिकेंस प्राेग्रेसिवा नावाचा राेग झाला आहे आणि त्यामुळे असे हाेत आहे. 13 वर्षांच्या शाॅनी नॅमकच्या शरीरावर लहानशा जखमेनंतरही एक अतिर्नित हाड तयार हाेते. अशा रितीने एक पूर्णपणे नवीन सांगाडा तयार हाेत आहे.नॅमकचे हात वळलेल्या अवस्थेत आखडले आहेत. तिची मान आणि पाठही आखडले आहे. हा रहस्यमय आजार असा आहे, जाे स्नायूंना हाडात बदलताे. त्याच्यावर काही इलाजही नाहीत. हळूहळू तिचे संपूर्ण शरीर इतके आखडेल की, ती एक पुतळा हाेईल. लंडनमध्ये राहणारी शाॅनीला आपल्या हाताने आपले ताेंडही धुता येत नाही. जगभरात 600 लाेक या आजाराने त्रस्त आहेत. सध्या याच्या इलाजासाठी केवळ संशाेधनच हाेत आहे.
 
Powered By Sangraha 9.0