ज्वालामुखीचा उद्रेक पाहण्यासाठी 4 किमी लांब रांग

    06-Apr-2021
Total Views |
 
f_1  H x W: 0 x
 
रेक्याविक, 5 एप्रिल (वि.प्र.) : 19 मार्च 2021 राेजी युराेपमधील आईसलँड देशात तब्बल 800 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. अद्यापही हा ज्वालामुखी धुमसत असून त्यातून अद्यापही लाव्हारस बाहेर पडत आहे.त्यामुळे या परिसरात भीषण उष्णता निर्माण झाली असली तरी हा ज्वालामुखी पाहण्यासाठी लाेकांच्या 4 किलाेमीटर लांब रांगा लागत आहेत. या भागात नुकताच भूकंप झाला हाेता.काही लाेक ज्वालामुखीचे फाेटाे काढत आहेत, तर काही सायकलिंग, स्टंट करीत आहेत. 20 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत 50,000 पेक्षा जास्त लाेकांनी हा ज्वालामुखी पाहिला; पण लाेकांची दरराेज संख्या वाढत असल्यामुळे यासाठी पाेलीस व इतर सुरक्षादल तैनात करण्यात आली आहेत. ज्वालामुखीपेक्षाही गर्दीचा बंदाेबस्त करणे कठीण ठरत आहे.