वसई-विरारमध्ये 16 लाखांची दंडवसुली

    06-Apr-2021
Total Views |

v_1  H x W: 0 x 
 
विरार, 5 एप्रिल (आ.प्र.) : वसई-विरार परिसरात काेराेना माेठ्या झपाट्याने पाय पसरत आहे. पालिकेकडून काेराेना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत, पण नागरिकांकडून त्याचे पालन हाेताना दिसत नाही. पालिकेने महिनाभरात अशा हजाराे नागरिकांवर कारवाई करत 16 लाख 40 हजार 200 रुपयांची दंडवसुली केली आहे.मार्चच्या सुरुवातीपासूनच शहरात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.त्यामुळे महापालिका आयुक्त गंगाथरन डी.यांनी कडक निर्बंध लागू केले हाेते. प्रभाग समिती स्तरावर दैनंदिन व आठवडे बाजार बंद करण्यात आले हाेते. दुकाने, माॅल, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट आदी ठिकाणी हाेणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सूचना केल्या हाेत्या. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानुसार पालिकेच्या सर्वच प्रभागांत कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पालिकेने एकाच महिन्यात 16 लाखांची दंडवसुली केली आहे. त्यात सर्वाधिक पावणेसात लाखांचा दंड प्रभाग समिती-जी (वालीव)मधून वसूल करण्यात आला आहे.