तुळशीचा वापर करून आपले साैंदर्य वाढवा...

    30-Apr-2021
Total Views |
 

tulsi_1  H x W: 
 
 
तुळस पवित्र आहे, पूजनीय आहे आणि आराेग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळस आपल्या त्वचेची उत्तम दाेस्त बनू शकते. तुळशीच्या वापराने तुमचं साैंदर्य वृद्धिंगत कसं कराल, जाणून घ्या... तुळशीचं नाव काढताच आपल्याला आठवताे गरम, मसालेदार चहा. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीचा वापर केवळ सुगंधासाठी केला जाताे असे नाही तर अगदी पूर्वीपासून आयुर्वेदिक जडी-बुटी म्हणून वेगवेगळ्या आजारांमध्येही तुळशीचा वापर केला जाताे. म्हणूनच तिला मदर मेडिसिन ऑफ नेचर किंवा हाेली बेसिल असंही म्हणतात. डागविरहित, सुंदर, चमकदार चेहरा प्रत्येकालाच हवा असताे. पण आजची बिघडलेली जीवनशैली, प्रदूषण आणि धावपळ यामुळे चेहऱ्यावरील चमक नाहिशी झाली आहे. या समस्येचं उत्तरही तुळशीत लपलं आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात के जीवनसत्त्व आढळते. त्याचबराेबर यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी कॅन्सरस गुण आहेत.
 
 
तुळशीच्या नियमित सेवनाने र्नतसंचार सुधारताे. तुळस आपल्या याच गुणांमुळे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. औषधी गुणांनी समृद्ध तुळशीच्या रसात थाइमाेलनावाचा घटक आढळताे. हा त्वचेशी संबंधित समस्यांपासून मु्नती देताे. यामुळेच तुळशीच्या पानापासून तयार केलेला फेसपॅक त्वचेशी संबंधित समस्यांपासून मु्नती देताे. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या उजळताे. सगळ्यात खास फायदा असा की, तुळशीचा काेणताही दुष्परिणाम नाही. जर तुम्ही सुद्धा तुमचं साैंदर्य उजळविण्याचा प्रयत्न करत असाल तर तुळशीचा वापर करण्यास सुरुवात करा... चमकेल त्वचा दुधाबराेबर तुळशीची पानं वाटून घ्या. त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ती चेहऱ्याला लावा, वीस मिनिटांनंतर चेहरा धुवा. तुळशीचाफेस पॅक त्वरित परिणाम दाखवून त्वचा चमकदार हाेईल. यामुळे त्वचेची राेमछिद्रं स्वच्छ हाेतात आणि त्यांच्यात नवी जान येते. तसंच तुळशीचाफेस पॅक मृत त्वचेची देखभाल करताे. हा पॅक दाेनतीन महिने नियमित लावल्यास फरक जाणवेल.
 
 
अ‍ॅक्नेपासून मु्नती तुळस आणि कडुलिंबाची पानं एकत्र वाटा आणि मग पेस्टमध्ये थाेडं चंदन मिसळा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. जेव्हा पेस्ट सुकेल तेव्हा साध्या पाण्याने चेहरा धुवा. तुळस आणि कडुलिंबात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुण असतात, ज्यामुळे अ‍ॅक्नेपासून मु्नती मिळते. पेस्टमध्ये असणाऱ्या चंदनामुळे त्वचा काेमल हाेते. तुळस आणि कडुलिंबाची पानं एकत्र वाटून त्यामध्ये अर्धा चमचा बेसन आणि मधाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर धुवून टाका. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम हाेईल. त्वचा हाेईल डागविरहित संत्र्याची सुकलेली साल आणि तुळशीची पानं एकत्र वाटून घ्या. याचाफेस पॅकच्या रूपात वापर करा. तुम्ही तुळस आणि चंदन पावडरचाही उपयाेग करू शकता. हे एक चमचा दूध पावडरमध्ये मिसळा. हाफेस पॅक पाच-दहा मिनिटं चेहऱ्यावर लावा. सुंदर त्वचेसाठी तुम्ही दरराेज तुळशीची पाच पानंही चावू शकता. र्नत स्वच्छ हाेईल आणि डागही नाहिसे हाेतील.