काेराेनामुळे नाेकरी गेल्यामुळे स्मशानात चाकरी करणारे मराठी जाेडपे

    30-Apr-2021
Total Views |
 
 
couple_1  H x W
 
काेराेना साथीमुळे लाॅकडाऊन लागल्यानंतर अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. पण, त्यांनी धीर साेडला नाही. काेणी भाजीपाला विकू लागले, तर काहींनी फळांचे स्टाॅल सुरू केले, तर बडाेदा येथील एका जाेडप्याने च्नक स्मशानात काेराेनामुळे मृत्यू झालेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची ‘चाकरी’ सुरू केली आहे. चाकरी या शब्दाचा अर्थ कर्तव्य, धर्म, सेवा किंवा इलाज असाही हाेताे. मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असलेला कन्हैयालाल शिर्के गुजरातमधील बडाेदा शहरात एका खासगी कंपनीत नाेकरी करीत हाेता.
पण, काेराेनाच्या लाॅकडाऊन काळात शिर्केची नाेकरी गेली. पण आपल्या कुटुंबाला एकवेळ तरी पाेटभर जेवण मिळावे या अपेक्षेने ताे आपल्या कुटुंबासह स्मशानात राहायला गेला.
 
आता स्मशानात अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागतात. पण, आपल्याला काेराेनाची लागण हाेईल या भीतीने इतर लाेकच नव्हे, तर मृतांचे जवळचे नातेवाईकसुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नाहीत. अशा लाेकांची मदत करण्याचा कन्हैयालाल शिर्के आणि त्याच्या पत्नीने पुढाकार घेतला व हे जाेडपे काेराेनामुळे मृत्यू झालेल्या लाेकांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार करू लागले. त्याच्या बदल्यात मृतांचे नातेवाईक या जाेडप्याची व त्याच्या कुटुंबीयांची दाेन वेळच्या जेवणाची व्यवस्था करतात. चितेला आग लावून हे जाेडपे पाेटाची आग शांत करीत आहे. काही नातेवाईक मृतांच्या अस्थीसुद्धा घ्यायला येत नाहीत, अशावेळी हे जाेडपे विधीपूर्वक अस्थी विसर्जन करते. या जाेडप्याचे सेवाभावी आणि मानवतावादी काम पाहून आता शहरातील अनेक दानशूर व्य्नती, संस्था शिर्के कुटुंबाची आर्थिक मदत करीत आहेत.