अंधाऱ्या गुहेत 40 दिवस, संपूर्ण विलगीकरणासाठी फ्रान्समध्ये प्रयाेग

    30-Apr-2021
Total Views |
 

caves_1  H x W: 
 
काेराेना साथराेगाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी फ्रान्समध्ये लाॅकडाऊन करण्यात आला. हा लाॅकडाऊन सुरू झाल्यावर फ्रान्समधील 15 स्वयंसेवकांचा एक गट येथील एका अंधाऱ्या गुहेत जाऊन राहिला आहे. संपूर्ण विलगीकरणात राहून मानवी शरीर आणि मनावर काय परिणाम हाेताे, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. फ्रान्समधील प्यारेनीस पर्वतावरील लाेम्ब्रिव्हेस गुहेमध्ये 15 पुरुष आणि स्त्रिया सहा आठवडे राहिले. संशाेधक ख्रिश्चन क्लाॅट यांच्या नेतृत्वाखालील या संशाेधनाला ‘डीप टाइम’ असे नाव देण्यात आले आहे. या 40 दिवसांत त्यांच्याजवळ फाेन नव्हते, घड्याळ नव्हते अथवा त्यांच्या डाेळ्यांना नैसर्गिक प्रकाशही दिसत नव्हता. मात्र, त्यांचे खासगीपण जपण्यासाठी त्यांना स्वतंत्र तंबू ठेवण्यास परवानगी हाेती. ‘तीन स्वतंत्र जागा उभारण्यात आलेल्या आहेत.
झाेपण्यासाठी, एकमेकांसमवेत वेळ घालवण्यासाठी आणि तिसरी म्हणजे अभ्यासासाठी. विशेषतः झाडे आणि झुडपांच्या अभ्यासासाठी,’ अशी माहिती क्लाॅट यांनी गुहेत जाण्याच्या काही काळ आधी प्रसारमाध्यमांना दिली हाेती.
 
काय हाेता अभ्यास?
 
27 ते 50 या वयाेगटातील सात पुरुष आणि सात महिला या अभ्यासात समाविष्ट हाेत्या.
या सर्वांना 12 अंश सेल्सिअस तापमानात सातत्याने राहण्याची शारीरिक क्षमता हवी.
 या सर्वांना सेन्सर्स बसवण्यात आले हाेते.
 पृथ्वीवरील नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळ्या जमिनीखालील वातावरणात मानवी शरीर कसे प्रतिसाद देते, याचा अभ्यास करण्याची सर्वच शास्त्रज्ञांना उत्सुकता.
 या स्वयंसेवकांना काेणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार नव्हती.
 स्वयंसेवकांमध्ये एक सराफ व्यावसायिक, भूलतज्ज्ञ, सुरक्षारक्षक यांचा समावेश हाेता.
 गुहेमध्ये पाण्याची साेय करण्यात आली हाेती आणि जनरेटरच्या माध्यमातून वीजही पुरवण्यात आली हाेती.
 या प्रयाेगासाठी खासगी आणि सार्वजनिक माध्यमातून अर्थपुरवठा करण्यात आला.
 वेळ, काॅम्प्युटर, माेबाइल फाेन यांच्याशिवाय जगण्याचा अनुभव घेण्यासाठी आपण हे केले, असे 29 वर्षांचा जीवशास्त्रज्ञ अर्नाैड बरेल याने सांगितले. आयुष्यातील केवळ 40 दिवस म्हणजे सागरातील केवळ एक थेंब असे ताे सांगताे.