नवी दिल्ली, 2 एप्रिल (वि.प्र.) - भारतात औषधी आणि टे्ननाॅलाॅजी क्षेत्रात अनेक अब्जाधीश बनले आहेत.यापूर्वी मुकेश अंबानी आणि गाैतम अदानी यांच्यासारखे अब्जाधीश फक्त जड उद्याेग क्षेत्रातच दिसून येत असत. आता फार्मास्युटिकल्स आणि टे्ननाॅलाॅजी क्षेत्रात नवे अब्जाधीश बनले आहेत. अर्थव्यवस्थेतील हा महत्त्वाचा बदल मानण्यात आहे. कारण हे नवे अब्जाधीश भावी व्यवसायाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.गेल्या वर्षांच्या हुरून रिपाेर्टनुसार सन 2020 मध्ये 50 नवे अब्जाधीश आढळून आले. त्यात फक्त 10 लाेकच परदेशातील आहेत. भारतात सध्या 177 अब्जाधीश आहेत. 2017 मध्ये अब्जाधीशांची संख्या फ्नत 100 हाेती. त्यात अनिवासी भारतीय अब्जाधीशांचा समावेश केल्यास ही संख्या 207 हाेईल. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 35 लाख काेटी रु. पेक्षाही जास्त आहे. कंन्झ्युमर खर्चाने चालणारे हे व्यवसाय भाैतिक संपत्तीवर बनलेल्या व्यवसायाच्या बरेच पुढे आहेत. बुद्धीच्या भांडवलावर हे लाेक अब्जाधीश बनले आहेत. पण आश्चर्य असे की, अब्जाधीश बनविणारे कन्स्ट्र्नशनसारखे उद्याेग घसरणीला लागले आहेत. यावर्षी नवे 12 भारतीय अब्जाधीश फार्मास्युटिकल उद्याेगातील आहेत, तर 9 अब्जाधीश कन्झुमर गुडस व्यवसायातील आहेत. टे्ननाॅलाॅजीचे शेअर मूल्य जगभरात वाढल्याचा हा परिणाम आहे. भारतीय अब्जाधीशांची विशेषतः आय टी दिग्गजांची संपत्ती 2016 च्या 2.17 लाख काेटीवरून आता 6.8 लाख काेटी रु. झाली आहे.त्यात अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. परदेशात अनेक प्राेफेशनल भारतीय मॅनेजर अमेरिकन कंपन्या चालवित आहेत.गेल्या वर्षी 2020 मध्ये परदेशातील 41 शहरात राहणाऱ्या भारतीयांची संपत्ती 1000 काेटी रु.पेक्षा जास्त आढळून आली आहे. 5 वर्षांपूर्वी ही संख्या फ्नत 14 हाेती. भारतात मुंबईनंतर चेन्नई, हैद्राबाद यासारख्या 70 शहरात अब्जाधीश राहतात.