रशियाने आणली प्राण्यांसाठी लस

03 Apr 2021 12:36:00
 
x_1  H x W: 0 x
 
माॅस्का, 2 एप्रिल (वि.प्र.) : रशियाने जगात पहिल्यांदा प्राण्यांना देता येईल अशी काेराेना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. यामुळे जनुकीय बदल हाेऊन साथ पसरवणारे नवे विषाणू तयार हाेण्याची प्रक्रिया थांबेल, असे रशियाने म्हटले आहे. याच महिन्यात या लसीचे उत्पादन सुरू हाेणार आहे.कार्निवाक काेव असे या लसीचे नाव असून, तिच्या चाचण्या ऑ्नटाेबरमध्ये कुत्री, मांजरे, काेल्हे यांच्यावर झाल्या असून, त्या यशस्वी ठरल्या आहेत. ज्या प्राण्यांना लास दिली त्यांच्या शरीरात 100 टक्के अँटीबाॅडी तयार झाल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0