अमरावती 2 एप्रिल (वि.प्र.) तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मुंडन करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे देशाच्या कानाकाेपऱ्यातून भाविक तिरुपतीला मुंडन करण्यासाठी येत असतात. मुंडन केलेले हे केस चाेरून तस्करीच्या मार्गाने परदेशात विकून कमाई करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून या तस्करीला आता राजकीय वळण मिळाले आहे.केसांच्या या तस्करीत सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेसचा हात असल्याचा आराेप तेलगु देसमचे नेते आणि माजी मंत्री अयण्णा पयूडू यांनी केला आहे. तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात भ्नतांनी मुंडन करून देवाला अर्पण केलेले 120 पाेती भरलेले केस ईशान्य भारतातील आसाम रायफल्सच्या जवानांनी जप्त केले आहेत. या केसांची किंमत 2 काेटी रु. हाेते. हे केस तस्करीच्या मार्गाने बेकायदेशीरपणे परदेशात पाठविण्यात येणार हाेते.