आता पाचशे रुपयांत आरटीपीसीआर चाचणी : टाेपे यांची घाेषणा

    03-Apr-2021
Total Views |
खासगी प्रयाेगशाळांत करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे दर पुन्हा कमी
 
d_1  H x W: 0 x
 
मुंबई, 2 एप्रिल (आ.प्र.) : राज्यात खासगी प्रयाेगशाळांत करण्यात येणाऱ्या काेराेना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून, आता काेराेना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याबराेबरच रॅपिड अँटिजेन अँटीबाॅडीज तपासणीचे दरही कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घाेषणा आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी केली आहे. यासंदर्भात आराेग्य विभागाने शासन निर्णयही जाहीर केला आहे.काेराेनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासगी प्रयाेगशाळांत करण्यात येणाऱ्या काेराेना चाचणीचे दर सातत्याने राज्य शासनाकडून निश्चित करण्यात येत असून, आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करून 4500 रुपयांवरून आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयाेगशाळांना बंधनकारक करण्यात आल्याचे टाेपे यांनी सांगितले.यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टाेबर आणि डिसेंबरमध्ये सातत्याने काेराेना चाचण्यांच्या दरांत सुधारणा करत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये, असे दर निश्चित करण्यात आले हाेते. निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार काेराेना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रांवरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, काेविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमधील प्रयाेगशाळेतून नमुना तपासणी आणि अहवालासाठी 600 रुपये, तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देण्यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत.राज्यात काेणत्याही खासगी प्रयाेगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आराेग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.आरटीपीसीआर चाचणीसाेबतच रॅपिड अँटिजेन, अँटीबाॅडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. ते अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयाेगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास, अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबाॅडीज (एलिसा फाॅर सार्स काेविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फाॅर सार्स काेविड अँटीबाॅडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयाेगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300, असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामग्री माफक दरात उपलब्ध हाेत असल्याने, तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्चही कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयाेगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयाेगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी हाेणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.