गुगलवर ऑनलाइन क्लासेसचा जास्त शाेध

    03-Apr-2021
Total Views |

क,_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 2 एप्रिल (आ.प्र.) : गेल्या वर्षी काेराेना काळात असंख्य लाेकांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’ जाॅब्स आणि ऑनलाइन काेर्सेसचा जास्त शाेध घेतला, अशी माहिती ‘गुगल’ कंपनीच्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालाचे शीर्षक - ‘इंडियाज डिटरमाइंड प्राेग्रेस’ असे आहे.गेल्या वर्षी सर्वांत जास्त ‘लर्निंग अ‍ॅन्ड सर्चिंग’ झाले. कारण लाॅकडाऊन काळात लाेकांमध्ये काहीतरी नवे शिकण्याची अभिलाषा निर्माण झाली हाेती. लाेकांनी ‘काेठेही काहीही शिकायचे’ ठरविले हाेते.याच कालावधीत उत्पन्न वाढविण्याचेही प्रयत्न झाले. सर्च इंजिननुसार गेल्या वर्षी ‘टियर - 2-3-4 शहरांच्या व्यतिर्नित ग्रामीण भागातील युजर बरेच वाढल्याचे दिसून आले. याशिवाय ‘लाेकल फर्स्ट’ अंतर्गत आपल्या भाषेत स्थानिक माहिती जास्तीत जास्त शाेधण्यात आली. स्थानिक भाषेत भाषांतर करण्यासाठी 1700 काेटी वेळा गुगल ट्रान्सलेटर अ‍ॅपचा वापर करण्यात आला. यासाेबतच 90% युजर्सनी आपल्या भाषेत आराेग्यविषयक सर्च केले व वर्षभर याच विषयाला प्राधान्य देण्यात आले. ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्यासाठी 300% सर्चिंग वाढली.