सिडने, 2 एप्रिल (वि.प्र.) : एखाद्या ग्राहकाकडे त्याने गरजेपेक्षा अधिक साैरवीज तयार केली असल्यास त्याच्या बदल्यात चक्क बिअर देण्याचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीने मांडला आहे.असाही समूहाच्या कार्लटन अँड युनायटेड ब्रुअरिजने हा प्रस्ताव मांडला आहे. या देशातील अनेक घरात साैर पॅनल छतावर बसवण्यात आली असून, त्यातून निर्माण हाेणारी वीज वापरली जाते. 2025 पर्यंत 100 टक्के रिन्यूएबल एनर्जी वापरण्याच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी असे उपाय याेजले जात आहेत. राेख रक्कम देण्यापेक्षा तितक्याच रकमेची बिअर दिली जाणार आहे.